ग्रामपंचायत शिंदेवाडी
तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर
म्हसोबाच्या नावानं चांगभलं
Menu
शिंदेवाडी गावाचे ग्रामदैवत काळम्मादेवी आहे. तसेच यास जागृत देवस्थानचा वारसा लाभला आहे.
गाव राजकीय सामाजिक सांस्कृतिकरित्या पुढारले असून गावाच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्ती तन्मयतेने झटत असते. तरुण मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिकपणा जपला जात असतो
ग्रामपंचायत दोनवडे
ग्रामपंचायत शिंदेवाडी
शिवजयंती (छत्रपती शिवाजी महाराज जयंती) हा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे, जो दरवर्षी १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी बांधवांकडून अत्यंत उत्साह, अभिमान आणि जल्लोषात साजरा केला जातो या दिवशी महाराजांच्या पराक्रमाची, स्वराज्याची आणि सामाजिक न्याय मूल्यांची आठवण ठेवून पोवाडे, मिरवणुका आणि व्याख्यानांचे आयोजन केले जाते
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळीलशिवनेरी किल्ल्यावर झाला आई राजमाता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे भोसले महाराजांनी १७ व्या शतकात मुघल आणि इतर आदिलशाही सत्तांना विरोध करत ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले शिवजयंती उत्सवाची सुरुवात १८९५ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली, ज्याचा उद्देश लोकांमध्ये देशभक्ती आणि आत्मसन्मान जागृत करणे हा होता किल्ले शिवनेरीवर शासकीय पूजा, शहरांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका, महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
ग्रामपंचायत शिंदेवाडी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेद्वारे आयोजित केलेली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा गात, राष्ट्रभक्ती आणि स्वधर्म निष्ठेच्या प्रेरणेतून तरुणांना एकत्र आणणारी एक विशेष दौड किंवा मॅरेथॉन आहे, जी नवरात्रीत किंवा इतर प्रसंगी केली जाते, ज्यामध्ये भगवा ध्वज आणि जयघोषात देशाभिमानाची भावना जागृत केली जाते आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय असते.
दुर्गादौडची प्रमुख वैशिष्ट्ये:
थोडक्यात, दुर्गादौड म्हणजे एक देशभक्तीपर आणि प्रेरणादायी उपक्रम आहे जो तरुणांना एकत्र आणतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करतो.
ग्रामपंचायत शिंदेवाडी



ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
तुकाराम भजनी मंडळ पौराणिक महत्त्व
ग्रामपंचायत शिंदेवाडी, ता करवीर येथील तुकाराम भंजनी मंडळ मंदिराची स्थापना सन १९७२ साली.या मंदिराची स्थापना लोकवर्गणीतून केली आहे.या मंदिरानंतर श्री संत तुकाराम भजनी मंडळ मंदिराची स्थापना झाली. त्यानंतर एकवीस वर्षांनी मंदिराचा जीर्णोद्धार झाला
सन १९९३ श्री संत तुकाराम भजनी मंडळ मंदिराची स्थापना झाली. ग्रामदैवत श्री.संत तुकाराम महाराज मंदिर गावात आहे. पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी श्री.संत तुकाराम भजनी मंडळांकडून श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आयोजित केला जातो मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असतो.शेवट दिवशी गावातून पालखी काढली जाते आणि महाप्रसाद वाटप केले जाते. गावात २१ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे.
सन २०१९ साली श्री गणेश मूर्ती व मारुती मूर्ती स्थापना करण्यात.सन २०१४ नवीन मंदिर बांधकाम सुरु करण्यात आली गावातील ग्रामस्थ मंदिरात येऊन विविध कार्यक्रम, पुजा करतात.
सध्या गावातील तुकाराम भजनी व इतर धार्मिक स्थळे शिंदेवाडीमध्ये आहेत.
अ.क्र | नाव |
१ | श्री. प्रकाश दत्तात्रय पाटील |
२ | श्री. अंबाजी कृष्णा नाटूले |
३ | श्री. मसाजी जोतीराम पाटील |
४ | श्री. तानाजी शंकर शिंदे |
५ | श्री. बळवंत दादासो पाटील |
६ | श्री. बापू बाबू शिंदे |
७ | श्री. निवृत्ती ज्ञानू पाटील |
८ | श्री. अनिल शामराव शिंदे |
९ | श्री. शिवाजी बाबुराव शिंदे |
१० | श्री. बाबासो बळवंत चव्हाण |
ग्रामपंचायत शिंदेवाडी
विठल रुक्मिणी भजनी मंडळ पौराणिक महत्त्व
सर्वत्र मध्य मांसाने नववर्षाचे स्वागत करावयाची तयारी सुरू असताना शिंदेवाडी तालुका करवीर येथे मध्यमांसविना ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन कीर्तन आणि संपूर्ण गावाला महाप्रसाद वाटप अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमाने नववर्षाचे स्वागत करण्यात आली. सलग 28 व्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला या आगळ्या उपक्रमांनी संपूर्ण जिल्ह्यात या गावाने आदर्शचा पाठ घालून दिला आहे. शिंदेवाडी तालुका करवीर या गावात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे या संप्रदायांने २७ वर्षेपूर्वी मध्य व मांसा वर्ज्य करून विधायक पद्धतीने आणि धार्मिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या वर्षी गावात ज्ञानेश्वरी ची पारायण भजन, प्रवचन कीर्तन आणि महाप्रसाद वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला या उपक्रमा संपूर्ण गावातून चांगला प्रतिसाद मिळाला संपूर्ण गावाने मध्य मांस वर्ज्य करून महाप्रसादाचा लाभ घेतला आणि ही परंपरा सुरू केली झाली गेली 28 वर्षे या गावात हा आगळावेगळा उपक्रम अखंडपणे सुरू आहे.
अ.क्र | नाव |
१ | श्री. आनंदा महादेव पाटील |
२ | श्री. राजेंद्र रंगराव वडगावकर |
३ | श्री. संभाजी आकाराम पाटील |
४ | श्री. निवृत्ती दौलू पाटील |
५ | श्री. भरत केरबा पाटील |
६ | श्री. दिलीप बापुसो शिंदे |
७ | श्री. सर्जेराव लक्ष्मण पाटील |
८ | श्री. बंडा श्रीपती पाटील |
९ | श्री. सीताराम भाऊ पाटील |
१० | श्री. बळवंत महादेव वडगावकर |
११ | श्री. सरदार बापू पाटील |
१२ | श्री. सरदार शिवाजी यादव |
१३ | श्री. पंडित दादू वडगावकर |



ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
चैत्र महिन्यात मोठया प्रमाणात यात्रा भरली जाते. यात्रेच्या काळात ग्रामस्था येऊन धार्मिक कार्यक्रम करतात. तसेच दसरा उत्सवात मंदिराची रंगरंगोटी हे सर्व लोकवर्गणी मधून केले जाते. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात.
खंडेनवमी, सोने लुटणे हे कार्यक्रम दरवर्षी एकाच दिवशी घेतले जातात.
ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय दहा दिवसांचा सार्वजनिक सण आहे, जो सहसा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) साजरा होतो. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला हा उत्सव आता सार्वजनिक एकता, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बाप्पाच्या आगमनाने व विसर्जनाने आनंदाने साजरा केला जातो. या काळात घराघरात व मंडळांमध्ये मूर्तीची स्थापना करून मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते, ज्याला ‘महासिद्धीविनायकी चतुर्थी’ म्हणतात.हा उत्सव दहा दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जनाने त्याचा समारोप होतो.पारतंत्र्यात लोक एकत्र यावे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली भक्तीभावाने गणेशाची स्थापना करून आरती, मंत्रपुष्प, आणि २१ प्रदक्षिणा घातल्या जातात. बाप्पाला प्रिय मोदक आणि लाडूंचा नैवेद्य अर्पण केला जातो. सार्वजनिक मंडळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, नृत्य आणि नाटकांचे आयोजन केले जाते हा सण लोकांना एकत्र आणण्याचे आणि ऐक्याची भावना वाढवण्याचे काम करतो.
भाद्रपद चतुर्थीव्यतिरिक्त, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला ‘माघी गणेश जयंती’ किंवा ‘तिलकुंद चतुर्थी’ साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि गणेश तत्त्व नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते.