ग्रामपंचायत शिंदेवाडी
तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर
म्हसोबाच्या नावानं चांगभलं
Menu
कोल्हापूर शहरापासून अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर असलेले शिंदेवाडी गाव क्रीडा व सहकार क्षेत्रात नावाजलेले आहे.
शिंदेवाडी गावाचे ग्रामदैवत काळम्मादेवी आहे. तसेच यास जागृत देवस्थानचा वारसा लाभला आहे.
सन १९७४ साली शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. गावांमध्ये शिंदे व पाटील भावकी असल्याने गावाला शिंदेवाडी नामकरण झाले
कोल्हापूर पासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी गाव वसले आहे. गावाची लोकसंख्या १८०० च्या आसपास असून गावातील शेतकरी भात, ऊस, भुईमुग, सुर्यफुल इत्यादी पिके घेत असतात. गावांमध्ये सहकारी तत्त्वावर विविध कार्यकारी विकास सेवा संस्था, दूध संस्था, पाणीपुरवठा संस्था, पतसंस्था कार्यरत आहेत. गावचे शेती क्षेत्र भोगावती नदीच्या क्षेत्रात येत असल्याने शेती बागायती स्वरूपाची असल्याने ग्रामस्थांचा अर्थव्यवहार चांगला असल्याने गावामध्ये सहकाराची बिजे रोवली आहेत. गाव राजकीय सामाजिक सांस्कृतिकरित्या पुढारले असून गावाच्या विकासासाठी प्रत्येक व्यक्ती तन्मयतेने झटत असते. तरुण मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिकपणा जपला जात असतो पूर्वी शिंदेवाडी, साबळेवाडी, खुपिरे ग्रामपंचायत होती.









ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी, ता करवीर येथील काळम्मादेवी मंदिरामध्ये दर वर्षी अश्विन महिन्यात यात्रेसाठी हजारो भाविक येतात. या यात्रेस शंभर वर्षांची परंपरा आहे.कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात भोगावती नदीच्या काठावर वसवलेले शिंदेवाडी व विशाल तीर्थक्षेत्रानंतर होणारी मोठी यात्रा म्हणून शिंदेवाडी येथील काळम्मादेवी यात्रेचा उल्लेख केला जातो. तेथील ग्रामदैवत काळम्मादेवी आहे. गावच्या मध्यभागी काळम्मादेवी देवाचे सुमारे १५० वर्षापूर्वीचे मंदिर आहे.
खुपिरे पैकी शिंदेवाडी या गावातील काळंमा ही ग्रामदेवता म्हणजे कालीच्या प्राचीन उपासनेचे प्रतीक आहे.वास्तविक कालीची उपासना उग्र देवता या स्वरूपात प्रचलित असली तरी इथे ती गावाच्या रक्षणाचा वसा घेतलेली जगन्माता आहे.तिच्या हातातील आयुधावरून हे स्पष्ट होते.शारदीय व चैत्री नवरात्र हे देवीचे दोन वार्षिक उत्सव साजरे करण्याची गावाची परंपरा आहे.
काळमादेवीचे हजारो भक्त पंचक्रोशीत असल्यामुळे देवीच्या उत्सवाला खूपच मोठा प्रतिसाद मिळतो.संपूर्ण करवीर क्षेत्राचा पौराणिक इतिहास सांगणारा करवीर माहात्म्यम् या ग्रंथाचे उत्सवाच्या वेळी पारायण व निरूपण केले जाते.गांव आणि आसपासच्या परिसरातील सर्व लोकांना सात्त्विक मार्ग दाखवणारे उत्सव ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने साजरे करतात.
धार्मिक प्रवृत्तीचे वातावरण गावात देवीच्या श्रद्धेमुळेच निर्माण झाले. व देवीवर पूर्ण विश्वास ठेवला तर आयुष्यात काहीच कमी पडत नाही.सर्व प्रकारच्या संकटात देवी आपल्या पाठीशी आहे अशी ग्रामस्थांची श्रद्धा असल्यामुळे संपूर्ण गांवात एकोपा आणि शांतता नांदते आहे.
वारकरी संप्रदायाचे आराध्यदैवत विठ्ठल रखुमाई व गणपती यांच्या मूर्तीपण याच मंदिरात स्थापन केलेल्या आहेत.त्यांचे उत्सवसुद्धा नियमितपणे मोठ्या उत्साहात पार पाडले जातात.
व्यसनमुक्त व तंटामुक्त गांव अशी गावाची ओळख या ग्रामदेवतांमुळे व त्यांच्या उत्सवामुळेच निर्माण झाली आहे.धार्मिक संस्काराचा वारसा पुढील पिढीला मार्गदर्शक ठरत आहे.
देवाचे मंदिर जुने व छोटे असले तरी देवाची कीर्ती पंचक्रोशीत पसरलेली असल्याने खुपिरे,साबळेवाडी, बालिंगा, नागदेवाडी, वाकरे, कुडित्रे, कोपर्डे, दोनवडे, यवलूज, वरणगे पाडळी येथील
sभाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविक अन्नधान्य दान करतात. त्यातून सुमारे तीन ते चार क्विंटल गव्हाची खीर प्रसाद म्हणून वाटली जाते. मुख्य यात्रेचा आठवडा शाकाहारी आठवडा म्हणून पाळला जातो. शेवटच्या दिवशी मंदिर समितीतर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते.
तसेच प्रत्येक मंगळवारी व हरीनाम सप्ताहास पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी असते. त्यावेळी देखील मंदिर समिती मार्फत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे दीडशे वर्षांची परंपरा असणारे काळमादेवी मंदिर आहे.
ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
२०० वर्षापूर्वी कै.गोविंदा भाऊ पाटील व कै भाऊ रामा पाटील कै . रामचंद्र राऊ पाटील यांच्या संयुक्त जागेत श्री म्हसोबा देवालयाची स्थापना करण्यात आली याठिकाणी छोटे खानी छपरी वजा मंदिर होते. सदरची जागा देवालयासाठी सोडण्यात आली आहे.पूर्वी कै गोविंद भाऊ पाटील देवालयाची पूजा करत होती. सध्या बंडा भाऊ पाटील करत असतात पूजा अर्चा करण्याचा मान पाटील भावकीला दिलेला आहे. देवळातील मूर्ती पाषाण स्वरूपाची असून याठिकाणी दर मंगळवारी शुक्रवारी रविवार या दिवशी कौल लावले जातात कौल बंडा भाऊ पाटील लावत असतात काही वेळेस अंगावर संकट अथवा रोगराई दुष्काळी यासारखे संकट येणार असेल तर ग्रामस्थांच्यावतीने म्हसोबाला कौल लावला एकादशी व संकष्टी दिवशी कौल लावल जात नाही.
चैत्र महिन्यात मोठया प्रमाणात यात्रा भरली जाते. यात्रेच्या काळात ग्रामस्था येऊन धार्मिक कार्यक्रम करतात. तसेच दसरा उत्सवात मंदिराची रंगरंगोटी हे सर्व लोकवर्गणी मधून केले जाते. गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे. नवरात्र काळात येथील पाटील अशा मानाच्या सासनकाठ्या उत्सवात सहभागी असतात.
ग्रामपंचायत शिंदेवाडी
मरगुबाई मंदिर स्थापना सन १९६५ साली झाली आहे कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील एक जागृत ग्रामदेवता आहे. गावात रोगराई, संकटे किंवा दुष्काळ आल्यावर, तसेच शुभकार्याआधी या देवीला गाऱ्हाणी घालून साकडे घातले जाते, ज्यामुळे तिला संकटहारिणी मानले जाते.म्हसोबा देवाची हि लहान बहिण आहे.असे मानले जाते. मरगुबाई हे देवीचे उग्र रूप मानले जाते, जे संकटांचा नाश करते.अनेक गावांमध्ये मरगुबाई हे मुख्य ग्रामदैवत असून, गावाच्या रक्षणकर्ती म्हणून तिची पूजा केली जाते.तसेच श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी खणानारळ अंबील असा नैवद्य असतो.व गावात पिकांची भरभराट होण्यासाठी, रोगराई दूर राहण्यासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी देवीला साकडे घातले जाते.
थोडक्यात सांगायचे तर, मरगुबाई ही ग्रामरक्षक शक्ती असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीतील एक महत्त्वाची देवता आहे.
ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
मारुती मंदिर प्राचीन मंदिर अआहे सन १९६२ साली स्थापना आहे. त्यानंतर ३५ वर्षानंतर त्या मंदिराचा जीर्नओधार करण्यात आला आहे. समाजाला बलोपासनेचे (शक्ती) महत्त्व सांगण्यासाठी। हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा) आणि शनिवारी विशेष गर्दी असते
ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी, ता करवीर येथील तुकाराम भंजनी मंडळ मंदिराची स्थापना सन १९७२ साली.या मंदिराची स्थापना लोकवर्गणीतून केली आहे.या मंदिरानंतर श्री संत तुकाराम भजनी मंडळ मंदिराची स्थापना झाली. त्यानंतर एकवीस वर्षांनी मंदिराचा जीर्णोद्धार झाला
सन १९९३ श्री संत तुकाराम भजनी मंडळ मंदिराची स्थापना झाली. ग्रामदैवत श्री.संत तुकाराम महाराज मंदिर गावात आहे. पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी श्री.संत तुकाराम भजनी मंडळांकडून श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आयोजित केला जातो मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असतो.शेवट दिवशी गावातून पालखी काढली जाते आणि महाप्रसाद वाटप केले जाते. गावात २१ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे.
सन २०१९ साली श्री गणेश मूर्ती व मारुती मूर्ती स्थापना करण्यात.सन २०१४ नवीन मंदिर बांधकाम सुरु करण्यात आली गावातील ग्रामस्थ मंदिरात येऊन विविध कार्यक्रम, पुजा करतात.
सध्या गावातील तुकाराम भजनी व इतर धार्मिक स्थळे शिंदेवाडीमध्ये आहेत.
ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
ग्रामपंचायत शिंदेवाडी
स्थापना –
ग्रामपंचायत शिंदेवाडी
स्थापना –



ग्रामपंचायत शिंदेवाडी